भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
![]()
भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,,
भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे मका ज्वारी बाजरी
गहू हरभरा पिकाचे नुकसान,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात दिनांक 2 एप्रिल रोजी चार वाजता वादळी वारा व अवकाळी पावसामुळे गारपीट मुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे मका ज्वारी गहू हरभरा पिकाचे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर पिकं वादळीवाऱ्यासह जमिन दोस्त झाले आहे शेतकऱ्यांचा तोंडांत आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावलयाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मका गहु हरभरा पिक कापनीवर आली होती माऋ नुकताच पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पपई पिकांची बाग निबु उत्पादक व मका ज्वारी बाजरी गहू लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्नांवर पाणी फिरले हातात आलेल उत्पन्न या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे पिक मातीमोल झाले यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अगोदरच मालाला गहू हरभरा मका बाजरी ज्वारी पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे अशा परिस्थितीत नुकसान झालेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांची वादळी वारा व अवकाळी पाऊस यामुळे घराचीपत्रे विजेच्या तारा खांबे तसेच झाडे उफडून निघाले आहेत तसेच भडणे हातनूर वरूळ सोनसेलू परिसरात काही प्रमाणे गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहेअसून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशि मागणी शेतकरी वर्गाने केली आहे याबाबत भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी शेतीमालांचे पिकांचे नुकसानी बाबत महसुल अधिकारी कृषी सहायक यांना सदर घटनेची नुकसानि बाबत माहिती दिली आहे

