महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा निर्धार ,डॉ. समाधान मैराळे यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प
![]()
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा निर्धार
डॉ. समाधान मैराळे यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प
अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या निवडीनंतर डॉ. मैराळे यांनी विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली.
नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. समाधान मैराळे, कार्याध्यक्षपदी सुरेश कांबळे तर सचिवपदी प्रवीण बैसाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून हितेंद्र बडगुजर व रिझवान मण्यार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघटनेच्या बळकटीसाठी संघटकपदी आत्माराम अहिरे, सहसंघटकपदी गणेश चौहान व राहुल भदाणे यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून यदुविर पाटील व सुरेंद्र जैन यांचा समावेश करण्यात आला असून, प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश पाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सत्तार खान, किशोर वाणी, रामेश्वर पवार, महेश संदानशिव, अजय बिऱ्हाडे, दीपक कुंभार, सागर मोरे, किशोर पाटील व परेश उदेवाल यांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना तालुकाध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देत संघटनेचा विस्तार करण्यासोबतच विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. सर्व पदाधिकारी एकजुटीने कार्य करून संघटनेला अधिक सक्षम व प्रभावी बनवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

