सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम  , ३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम
1 min read

सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम , ३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम

Loading

सलग ३०व्या वर्षी शिरूड विकास सोसायटीचा १००% कर्जफेडीचा मानाचा विक्रम

३१ मार्चला तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजारांचे कर्ज पूर्ण; शेतकऱ्यांच्या शिस्तबद्ध परंपरेला सलाम

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाने सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी नोंदवत सलग ३०व्या वर्षी १०० टक्के कर्जफेडीची परंपरा कायम राखली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी शिरूड विकास सहकारी सोसायटीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या तब्बल २ कोटी ९५ लाख ३३ हजार रुपयांच्या कर्जाची शेतकऱ्यांनी शंभर टक्के परतफेड करून एक आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोसायटीचे जिल्हा बँकेकडील संपूर्ण कर्ज फेडले गेले असून उर्वरित निधी सोसायटीच्या चालू खात्यात जमा झाल्याने संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे. शिरूड गावातील शेतकऱ्यांची कर्जफेडीतील प्रामाणिकता, शिस्त आणि सहकारभाव यामुळे हा विक्रम दरवर्षी अधिक दृढ होत आहे.
शिरूड विकास सहकारी सोसायटीकडे गावात भव्य व प्रशस्त सागवान लाकडाची इमारत असून त्याच ठिकाणी जिल्हा बँकेची शाखा कार्यरत आहे. याशिवाय स्वस्त धान्य दुकान व दुकान संकुल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देत सोसायटी गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०० टक्के कर्जफेडीचा टप्पा गाठण्यासाठी चेअरमन अरुण दादा पाटील, व्हाईस चेअरमन सविता ताई, संचालक प्रा. सुभाष पाटील, बापूराव महाजन, गोरख धनगर, धोंडू मास्तर, अनंतराव मोरे, सुभाष महाजन, सीताराम पाटील, भास्कर पाटील, वासुदेव पाटील, तिलोत्तमा ताई, शाम बापू, मीराताई पाटील तसेच सेक्रेटरी रविंद्र आप्पा, सेल्समन वीरभान जीभू, बापू मोरे यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक शेषराव साहेब, सोनवणे साहेब, आहिराव साहेब, भाऊसाहेब पाटील, प्रफुल पाटील, सुपडू पाटील, वसंत पाटील, नंदू पाटील आदींचे मोलाचे योगदान लाभले.
शिरूड गावातील सर्व शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे सहकार चळवळीचे हे यशस्वी मॉडेल उभे राहिले असून इतर गावांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *