जळगावात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” महानाट्याचा भव्य सोहळा; स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी , पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानचे आयोजन; १८ एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार आध्यात्मिक मेजवानी
![]()
जळगावात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” महानाट्याचा भव्य सोहळा; स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी
पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानचे आयोजन; १८ एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार आध्यात्मिक मेजवानी
जळगाव : श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त चि. वेदांत नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठानतर्फे जळगाव शहरात पहिल्यांदाच “श्री स्वामी चरित्र” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. सचिन बोधणे व श्री. गणेश राणे यांच्या सहनिर्मितीत साकारलेले, राजन शंकर कोठारकर लिखित व दिग्दर्शित हे नाटक महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सहित संपूर्ण भारतभर गाजले आहे. “कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ” या भूमिकेत प्रफुल्ल सामंत व दशरथ निकम यांच्या प्रभावी अभिनयामुळे हे नाटक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
प्रफुल्ल सामंत यांच्या बहारदार अभिनय व मार्गदर्शनामुळे हे नाटक प्रसन्न, अविस्मरणीय आणि अजरामर ठरले असून महाराष्ट्रातील गावागावांत प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे हाय-क्लास आध्यात्मिक महानाट्य आहे.
हा सोहळा दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृह, आर.आर. शाळेसमोर, जळगाव येथे पार पडणार आहे.
तिकिट दर २००, ३०० व ५०० रुपये असून ७ वर्षांवरील मुलांसाठी स्वतंत्र तिकीट आवश्यक आहे. इच्छुकांनी 8928555566 / 8668941799 / 9421213738 / 8087577520 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

