मध्यरात्रीची धाडसी चोरी! पेट्रोल पंपावरून डंपर लंपास
![]()
मध्यरात्रीची धाडसी चोरी! पेट्रोल पंपावरून डंपर लंपास
अमळनेर (प्रतिनिधी):
तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून ३० तारखेला मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास डंपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
हिंगोणे येथील निलेश संजय पाटील यांच्या मालकीचे एमएच ४८ एजी ८३०७ क्रमांकाचे डंपर गांधली येथील पेट्रोल पंपावर उभे करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पंपावरूनच डंपर पळवून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या डंपरबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास ९७३०३०१००९ किंवा ९७३०७५७५७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

