पेन्शन योजना विकल्पास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. –जळगांव जुक्टोच्या प्रयत्नांना यश.
![]()
पेन्शन योजना विकल्पास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.
–जळगांव जुक्टोच्या प्रयत्नांना यश.
जळगांव प्रतिनिधी
: १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्यातील शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना न देता राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. यात सुधारणा करून राज्यात २० सप्टेंबर २०२४ पासून UPS/RNPS/NPS यापैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्याचा विकल्प देण्यासाठी २८मार्च २०२५च्या जी.आर.नुसार ३१मार्च २०२६ पर्यंत प्रथम मुदतवाढ दिलेली होती. मात्र विहित मुदतीत वित्त विभागाने RNPS च्या कार्यपद्धती, लाभ, निकष याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न दिल्याने राज्यातील शिक्षक संवर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झालेली होती. यासंदर्भात जुक्टो संघटना, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सर्व विभागातील सन्माननीय शिक्षक/पदवीधर आमदारांच्या माध्यमातून सदर विकल्प देण्यास आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले. त्यास यश येऊन आजच्या जी.आर.नुसार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यासाठी आ. राजूमामा भोळे (आमदार जळगाव शहर), आ.सुधाकरजी अडबाले (शिक्षक आमदार नागपूर) आ.सत्यजीतदादा तांबे (पदवीधर आमदार नाशिक विभाग), डॉ.संजय शिंदे (राज्याध्यक्ष शिक्षक महासंघ) यांनी वित्त विभागातील अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्याशी चर्चा करून मुदतवाढ मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यासाठी डॉ.अतुल इंगळे यांनी पुढाकार घेतला असे जुक्टो संघटनेच्या वतीने प्रा.नंदन वळिंकार, डॉ.अतुल इंगळे, प्रा.सुनील गरुड, प्रा.किरण पाटील, प्रा.मनोज पाटील, प्रा.पराग पाटील, प्रा.राहुल वराडे प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.छाया चौधरी, प्रा.अनिता ओहळ यांनी कळविले आहे.

