गोरगावले बु. येथे एचपीव्ही लसीकरणाची प्रभावी सुरुवात; किशोरींच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वाची मोहीम सुरू
1 min read

गोरगावले बु. येथे एचपीव्ही लसीकरणाची प्रभावी सुरुवात; किशोरींच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वाची मोहीम सुरू

Loading

 

गोरगावले बु. येथे एचपीव्ही लसीकरणाची प्रभावी सुरुवात; किशोरींच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वाची मोहीम सुरू

चोपडा प्रतिनिधी

आज दिनांक 28/03/2026 शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगावले बु. ता.चोपडा येथे एच पी व्ही लसीकरणाची शुभारंभ करण्यात आला.

HPV म्हणजे Human Papillomavirus हा एक व्हायरस आहे, जो प्रामुख्याने लैंगिक संपर्कातून पसरतो. यामुळे विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) तसेच इतर काही कॅन्सर व जननेंद्रियावर गाठी (warts) होऊ शकतात.
त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हि लस घेणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करणवाल, व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार..
तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.गिरीष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली,
धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी- डॉ.गौरीशंकर शिसोदिया, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगावले बु. येथील वैद्यकीय अधिकारी- डॉ.दिनेश निळे, डॉ शर्वरी पाटील, यांच्या उपस्थितीत एच पी व्ही अर्थात HPV लसीकरण करण्यात आले.

या लसीकरण सत्रामध्ये 15 वर्षातील एकूण 389 अपेक्षित मुलींपैकी,
एकुण 23 मुलींनी एच पी व्ही चे लसीकरण करून घेतले.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हे गोरगावले बु. या ग्रामपंचायतचे प्रशासक तथा माजी सरपंच-सौ.सुरेखा कोळी यांच्या शुभ हस्ते लाभार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभारंभ करण्यात आले.

सदर लसीकरणवेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख, तालुका लसीकरण सनियंत्रण अधिकारी- दिलवर वडवी,

प्रसंगी उपस्थित सर्व लाभार्थींना व त्यांच्या पालकांना.. एच पी व्ही (HPV) लसीचे फायदे काय आहेत व 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींनाच हे लसीकरण का करून घ्यावे, या आणि इतर लसीकरणाविषयी सविस्तर माहिती डॉ.दिनेश निळे यांनी सर्व उपस्थितीना सांगितली.

प्राआकेंद्र-गोरगावले बु.येथील आरोग्य सहाय्यक- रविंद्र काटे, सुनील महाजन आरोग्य सहाय्यिका- सौ ज्योती न्हायदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- चि.कुणाल शिंदे, औषध निर्माण अधिकारी- सुयश बोरसे, आरोग्य सेवक- डॉ.महेंद्र पाटील, दिनकर वाघ, अनिल माळी, कनिष्ठ सहाय्यक- विशाल देवराज, आरोग्य सेविका-माधुरी बडगुजर, दिग्विजय पाटील,.रविंद्र पवार, डाटा ऑपरेटर- संतोष वाघ, गटप्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविका तथा सर्व लाभार्थी व त्यांचे पालक वर्गानी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *