अमळनेरच्या सुपुत्राचा मुंबईत गाजलेला ‘संगीत रामायण’चा भव्य प्रयोग , षण्मुखानंद हॉलमध्ये हाऊसफुल्ल शो; महेश मांजरेकर, पुनीत इस्सर यांसारख्या दिग्गजांची दमदार उपस्थिती, प्रेक्षक मंत्रमुग्ध
![]()
अमळनेरच्या सुपुत्राचा मुंबईत गाजलेला ‘संगीत रामायण’चा भव्य प्रयोग
षण्मुखानंद हॉलमध्ये हाऊसफुल्ल शो; महेश मांजरेकर, पुनीत इस्सर यांसारख्या दिग्गजांची दमदार उपस्थिती, प्रेक्षक मंत्रमुग्ध
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मूळ रहिवासी इंजिनिअर उल्हास ऊर्फ संजय महाले लिखित व दिग्दर्शित नृत्य-नाटिका एवम संगीत रामायणाचा श्रीराम नवमीला अर्थात 26 मार्च रोजी मुंबई येथील माटुंगा भागातील सर्वांत भव्य असलेल्या श्री षण्मुखानंद हॉल (ऑडिटोरियम ) येथे अतिभव्य प्रयोग झाला. असा प्रयोग यापूर्वी भारतीय रंगमंचावर कधी झालेला नव्हता, हे विशेष…! त्यातही विशेष म्हणजे महाराज दशरथाच्या भूमिकेत प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर तर रावणाच्या भूमिकेत ख्यातनाम अभिनेते पुनीत इस्सर होते. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत हिमांशू सोनी, हनुमानजींच्या भूमिकेत केतन करंडे, लक्ष्मणाच्या भूमिकेत कुणाल फडके, सीता मातेच्या भूमिकेत गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. स्वप्नील राजशेखर यांनी महर्षींची भूमिका केली होती, तर समीरा गुजर यांनी श्रीरामांच्या मातेची अर्थात कौशल्याची भूमिका केली होती. प्रख्यात संगीतकार नितीन शंकर यांनी संपूर्ण नाटिका स्वरबद्ध व संगीतबद्ध केली होती. गायिका सावनी रवींद्र व गायक नचिकेत देसाई यांनी अफलातून गीते सादर केली होती.
हा प्रयोग पाहण्यासाठी अमळनेर येथून मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, आनंद महाले, नगरसेवक विजय कहारू पाटील, व्यापारी महेश कोठावदे, भगवती टी स्टॉलचे संचालक बाळासाहेब अशोक पाटील, मंगल सेवेकेरी सौ. आशाताई महाले, पुषंद ढाके, अनिल कदम, चंद्रकांत महाजन, आशिष चौधरी, ए. डी. भदाणे, दत्तात्रय पवार, राजेंद्र बिऱ्हाडे, मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल पाटील, के. जे. सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई येथील प्रा. संदीप पाटील, माजी सैनिक स्वप्नील शिरसाठ, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रेडिओ एफ-एम मंगलध्वनीचे अजय पाटील, अकौफ्लटंट योगेश पाटील, दै. ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, मुख्य आर्टिस्ट समीर सांगळे, सेवेकरी संजीव बिऱ्हाडे, संजय सोनवणे, ऋत्विक पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. सर्वांनी या नाटिकेचा मनमुराद आनंद लुटला. हॉल खच्चून भरलेला होता. शो हाऊसफुल्ल असल्यामुळे अनेकांना नाराजीने परतावे लागले. दर दहा ते पंधरा मिनिटांत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता.
याबाबत दै. ‘ग्लोबल महातेज’ने अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता सर्वांनी नाटिकेचे तसेच लेखक व दिग्दर्शक संजय महाले, संगीत दिग्दर्शक नितीन शंकर, डिजिटल डायरेक्टर मिहीर महाले व महेक महाले यांचे मनसोक्त कौतुक केले. अनेकांनी तर आम्ही नि:शब्द आहोत. रामायणातील अनेक माहीत नसलेल्या गोष्टींचा उलगडा झाला. इतका सुंदर कार्यक्रम आणि तोही श्रीराम नवमीला अनुभवाला मिळाला, याबद्दल खूप धन्यता व्यक्त केली. अनेक भावुकप्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावत होते. ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला त्यांनी ‘आम्ही धन्य झालो’ या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
चौकट
आमच्या अमळनेरचा सुपुत्र व आमच्या मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांचे लहान बंधू अर्थात मुंबई महापालिकेचे निवृत्त उपायुक्त तसेच हॅपी- लकी इंटरटेनमेंटच्या माध्यमातून जगप्रसिद्ध अतिभव्य संगीत शोचे निर्माते-निर्देशक असलेले संजय महाले यांनी आता सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत आव्हानात्मक असलेल्या संगीत नाटिका या नवीन क्षेत्रात प्रवेश केला आहे. ज्या दमदार पद्धतीने आणि एकापेक्षा एक दिग्गज कलावंतांना सोबत घेऊन श्री. महाले यांनी रामायण रंगमंचावर सादर केले. त्यास शब्दबद्ध करणे केवळ अशक्य आहे. अमळनेरच्या मातीचा सांस्कृतिक सुगंध श्री. महाले यांच्यामुळे संगीतविश्वासोबतच आता सिने आणि नाट्यक्षेत्रातही दरवळतो आहे. अमळनेरचा सांस्कृतिक झेंडा राजधानीवर डौलाने फडकतो आहे, याचा एक अमळनेरकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.– एस. बी. बाविस्कर
सचिव, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर तथा जळगाव जिल्हाध्यक्ष, भाजप तीर्थक्षेत्र विकास आघाडी.
—

