श्री मंगळग्रह मंदिरात मंगलमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा
1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात मंगलमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात मंगलमय
वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त गुरुवार, दि. 26 मार्च रोजी मंगलमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती. व्यावसायिक रणजीत पाटील व सौ. सरिता रणजीत पाटील यांच्या प्रमुख यजमान होते.
रणजित पाटील यांच्या हस्ते सपत्निक प्रधान संकल्प, गणपती पूजन व पुण्याहवाचन झाले. श्रीराम स्वरूप भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक झाला. त्यानंतर दुपारी 12 वाजता मंगलध्वनींच्या सुरात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पाळणागीत झाले. जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, यतीन जोशी, मेहूल कुळकर्णी, वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले. दरम्यान, मंदिरात दिवसभर भाविकांची प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *