रेलचाईल्ड संस्थेचा सरस्वती विद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न
![]()
रेलचाईल्ड संस्थेचा सरस्वती विद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न
ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी): रेल चाइल्ड संस्था संचलित
सरस्वती मंदिर (माध्यमिक)
कल्याण पश्चिम येथे
मुख्याध्यापिका श्रीमती. छाया पाटील व रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मणिलाल शिंपी यांचा प्रमुख उपस्थितीत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभाग यांच्या वतीने “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नशामुक्त भारत अभियान जनजागृती निमित अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण विभागाचे पी एस आय सुहास तावडे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करत नशामुक्त समाज घडवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी आणि सकारात्मक जीवन जगण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ.मनिलाल शिंपी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन जीवनात शेजारी आपले नातेवाईक यांच्या बाबतीत नशे बद्दल अनेकांना अनुभव येत असते व्यसन हे किती घातक आहे याची प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहत असाल म्हणून शासनाला आज विद्यार्थ्यांमार्फत समाजामध्ये नशामुक्त भारत अभियान करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा संकल्पनेनुसार 2040 पर्यंत संपूर्ण भारत निशा मुक्त करण्याच्या निर्धार केला पाहिजे व प्रशासनाने दाखवलेला विश्वास सार्थकी लागला पाहिजे यासाठी सर्वांना आपल्यापासून आपली पदार्थ विरोधी मोहीम यशस्वी करण्यासाठी ,अमली पदार्थाचे सेवन करणे किती घातक आहे, त्यामुळे होणारे दुष्परिणाम या बाबत समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन केले व नशा मुक्त अभियानावर आधारित मराठी व गुजराती भाषेत नशा मुक्ती गीत गाऊन विद्यार्थ्यांना प्रसन्न केले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका सौ. वैशाली जाधव ,सौ.गीता पाटील शाळेचे RSP अधिकारी शिक्षक श्री. कांताराम महानवर यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी हवालदार श्याम जगताप व कांबळे मेजर, तसेच पोलीस नाईक मगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आर एस पी चे जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे यांनी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

