के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न
1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Loading

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील विद्यामंदिरात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) दि. २५/०३/२०२६ : के.सी.ई. सोसायटी जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व शैक्षणिक आधार देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगावचे संचालक डॉ. अशोक राणे, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री फालक तसेच पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांना तर गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिरातील २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना रोख रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली, तर ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोख रक्कमेसह शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी शिष्यवृत्तीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “ही विशेष शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या केवळ आर्थिक गरजा पूर्ण करणारी नसून त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षा, तसेच इतर शैक्षणिक गरजांसाठी अडचणी येतात. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या अडचणी दूर होऊन विद्यार्थी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतील.” त्या पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा योग्य उपयोग करून नियमित अभ्यास, वाचन, वेळेचे नियोजन आणि व्यक्तिमत्व विकास यावर भर द्यावा. ही मदत त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.” तसेच त्यांनी पालकांनीही मुलांच्या शिक्षणात सातत्याने सहभाग घ्यावा व त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पराग राणे यांनी प्रभावीपणे केले. या प्रसंगी दोन्ही शाळांतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *