दिशा अभियानात परिश्रम निवासी शाळेची सलग दुसऱ्यांदा बाजी; डॉ. योगेश महाजन यांच्या कार्याचा गौरव
1 min read

दिशा अभियानात परिश्रम निवासी शाळेची सलग दुसऱ्यांदा बाजी; डॉ. योगेश महाजन यांच्या कार्याचा गौरव

Loading

दिशा अभियानात परिश्रम निवासी शाळेची सलग दुसऱ्यांदा बाजी; डॉ. योगेश महाजन यांच्या कार्याचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी
: सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात दिशा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या शाळा म्हणून परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जि. जळगाव यांचा सलग दुसऱ्यांदा सन्मान करण्यात आला. चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित या परिश्रम विद्यालयाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
दिशा अभियान हे मा.दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालय विभाग, मुंबई, मा.आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय तसेच जय वकील फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2019 पासून राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून बौद्धिक अक्षम मुलांसाठी वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम (IEP) पोर्टलमार्फत प्रभावीपणे राबविण्यात येतो. यामध्ये अध्ययन-अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य, वर्कबुक्स, तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करणारे मॅन्युअल आणि नियोजनबद्ध वेळापत्रक यांसारख्या विविध घटकांचा उपयोग करण्यात येतो.
या प्रसंगी मा. श्री. सतिश बाळासाहेब धस (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. जळगाव), श्री. निलेश चव्हाण (राज्य समन्वयक, दिशा अभियान), श्री. सुरसिंग जाधव (सहायक लेखाधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जळगाव) श्री. भरत साळुंखे (जिल्हा समन्वयक, दिशा अभियान जळगाव) तसेच यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष अण्णासो डॉ योगेश रघुनाथ महाजन सर, संस्थेचे उपाध्यक्ष सौ अर्चना योगेश महाजन मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात 5 शाळांची निवड झाली असून यामध्ये पारोळा येथील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळेस दिशा अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग दुसऱ्यांदा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यावेळी डॉ योगेश महाजन सर व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही विशेष अभिनंदन मा. सतीश धस साहेब यांनी केले.
परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळेने दिशा अभियानाच्या माध्यमातून विशेष विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामुळे संस्थेच्या कार्यास अधिक बळ मिळणार असल्याची, भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमांस विविध पदाधिकारी व शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *