अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय
1 min read

अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय

Loading

अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर अलीकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः कॅन व ड्रममध्ये पेट्रोल व डिझेल घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यामुळे सामान्य मोटरसायकल व चारचाकी वाहनधारकांना वेळेवर इंधन मिळण्यात अडचणी निर्माण होत असून, काही ठिकाणी गोंधळाची परिस्थितीही निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांच्या मते, पेट्रोल पंपांवर केवळ वाहनांनाच पेट्रोल व डिझेल देण्याचे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. कॅन किंवा ड्रममध्ये इंधन देण्यावर मर्यादा किंवा तात्पुरती बंदी घातल्यास अनावश्यक गर्दी कमी होईल आणि सुरळीतपणे सेवा देता येईल.
तसेच, सुरक्षेच्या दृष्टीनेही कॅन-ड्रममध्ये इंधन देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहून पेट्रोल पंप मालकांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *