अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धा मुक्ताईनगर येथे संपन्न*.
![]()
*अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धा मुक्ताईनगर येथे संपन्न*.
मुक्ताईनगर- भारत सरकार अंतर्गत खेलो इंडिया च्या माध्यमातून सायकलिंग फेडरेशन आँफ इंडिया,सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, द सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा यांच्याद्वारे अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धांचे आयोजन मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आले होते. यात विविध शाळेतील 167 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्साह पूर्ण वातावरणात अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा अधिकारी, नितीन जंगम, उद्घाटक धर्मेंद्र लांबा, मुख्य पंच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, प्रमुख अतिथी प्रा संजय साठे ,सचिव सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, प्रा साईनाथ थोरात, अध्यक्ष सायकलींग असोसिएशन अहिल्यानगर, भिकन आंबे, खजिनदार सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, राजेंद्र चाटे पी आय मुक्ताईनगर डॉ प्रदीप साखरे ,सचिव जळगाव जिल्हा सायकलींग असोसिएशन जळगाव, प्राचार्य अनिल पाटील, प्राचार्य, वसंत वडसकर, राष्ट्रीय खेळाडू प्रांजल राणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सदर स्पर्धा 14 वर्षा आतील 17वर्षा आतील व 19 वर्षा वरील महिला गटामध्ये घेण्यात आल्या ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये शारीरिक तंदुरुस्त व उत्तम आरोग्य राहण्यासाठी सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य चांगल्या पद्धतीने राहील याकरता संपूर्ण महाराष्ट्र ठाणे, अहिल्यानगर,संभाजीनगर व जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.प्रत्येक गटातून एक ते सहा क्रमांक काढून एक दोन तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनींना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांना गौरविण्यात आले व उत्तेजनार्थ खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले *14 आतील वयोगटातील मुली* विजयी कुमारी स्मिता उमेश बढे, उपविजयी योगेश्वरी लक्ष्मण जायकर, तृतीय क्रमांक, लांडे आर्या योगेश, उत्तेजनार्थ प्रेरणा श्रीरामे, जानवी गोकुळ चित्ते, अक्षरा सुनील खेळवाडे, *सतरा वर्ष आतील मुली* विजयी कुमारी रिया विजय झोपे, उपविजयी ऐश्वर्या पांडुरंग दिवाने, तृतीय क्रमांक दिव्या राजू जोगी, उत्तेनार्थ दिपाली शरद बोदडे, हर्षदा नारायण पाटील ,दिव्या रमेश नाफडे *19 वर्षा वरील ओपन महिला गट* विजयी दिपाली रमेश पाटील,उपविजयी सुवर्णा कैलास पाटील ,तृतीय क्रमांक साक्षी दीपक पाटील ,उत्तेजनार्थ नैना प्रमोद सपकाळे ,ज्योती रमेश बागरे, शितल विनोद शिंदे , सदर स्पर्धेचे प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी खेळाचे महत्व पटवून दिले त्याचप्रमाणे महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे सचिव प्रा संजय साठे, राष्ट्रीय मुख्य पंच धर्मद्र लांबा व अध्यक्ष तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यींना शारीरिक आरोग्य व खेळाचे महत्व पाटवून दिले .सदर स्पर्धेला पंच म्हणून धर्मेंद्र लांबा ,प्रा साईनाथ थोरात, भिकन आंबे डॉ संजय निकम, संजीव वाढे, सुभाष गायकवाड, सुरेश मोरे, अनिल चव्हाण, नवल कोळी,शरद बोदडे, मनोज चौधरी, भोळे, रुपेश तायडे, मनीषा बोदडे, प्रतिभा ढाके, मोबीन शेख, ज्ञानदेव येवले, किरण भंगाळे, मनीष चौधरी, गोपाळ चौधरी, विजय संकत, सचिन कांडेलकर, विलास पाटील, मयूर महाजन यांनी पायलट व पंच म्हणून काम बघितले सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ संजय निकम यांनी केले आभार जिल्हा संघटनेचे सचिव डॉ प्रदीप साखरे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी ते करिता मुक्ताईनगर तालुक्यातील क्रीडा समन्वय समिती व स्वर्गवासी निखिल भाऊ खडसे इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर तसेच ई के टॅलेंट स्कूल तसेच मुक्ताईनगर येथील शाळांचे कर्मचारी शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले. सर्व क्रीडा शिक्षक व पंच यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .


