संगमनेर येथील ॲसिड हल्ल्याचा अमळनेरमध्ये तीव्र निषेध , सोनार समाज बांधवांचे एकत्र येत प्रशासनाला निवेदन; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी
![]()
संगमनेर येथील ॲसिड हल्ल्याचा अमळनेरमध्ये तीव्र निषेध
सोनार समाज बांधवांचे एकत्र येत प्रशासनाला निवेदन; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी
अमळनेर प्रतिनिधी
: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे १३ वर्षीय इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. ईश्वरी संजय डहाळे हिच्यावर एका नराधमाने केलेल्या भ्याड ॲसिड हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष व संतापजनक घटनेचा अमळनेर येथील सोनार समाज बांधवांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील सर्व सोनार समाज बांधव व भगिनींनी एकत्र येत माननीय प्रांताधिकारी, अमळनेर यांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये संबंधित आरोपीस कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच पीडित मुलगी कु. ईश्वरी डहाळे हिला तात्काळ सर्वोत्तम वैद्यकीय उपचार व शासकीय मदत मिळावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या घटनेमुळे समाजात तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा विकृत प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. राजेंद्र नीतूकडे, हेमंत पवार, दिलीप कुळथे, संजय मुंडके, योगेश पांडव, चिंतामण चित्ते, अविनाश पांडव, राजाराम कुळथे, गिरीश सराफ, मनोहर दहिवाळ, निलेश नागोरे, योगेश खोरे, तुषार कुळथे, कुलदीप मुंडके, प्रवीण मुंडके, अनिल विंचुरकर, अविनाश चित्ते, दिलीप मुंडके, पंकज पवार, हेमांशू पांडव, डॉ. दिलीप श्रीमावळे, सुनील विंचुरकर, निलेश देवपूरकर, नंदकुमार वाघ, सुरेश दहिवाळ, किरण सोनार, शिरीष डहाळे, पिंटू भामरे, विजय भामरे, दीपक पवार, भोमेश नागोरे, मंजित नागोरे, तसेच सौ. कुमुद नीतूकडे, सौ. माधुरी कुळथे, सौ. मोहिनी नागोरे, सौ. शुभांगी नागोरे, सौ. योगिता डहाळे, सौ. हर्षदा कुळथे, श्रीमती अनिता नीतूकडे, ममता पोतदार यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
समाजाच्या वतीने या घटनेबाबत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

