राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा*  *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित*
1 min read

राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित*

Loading

*राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार*
*वितरण सोहळा*

*जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित*

अमळनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’* वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०१७ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा चर्चगेट येथील SNDTमहिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात सायं. ५.०० वाजता संपन्न झाला.

स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात निरलस कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.ना.श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण) हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.ना.श्री. छगन भुजबळ, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, वेणुगोपाल रेड्डी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सेवावृत्तीचा वारसा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागातील निवडक ११ महिलांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या वर्षीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा ज्ञानजोती सावित्रीबाई फुले पुरस्कार, 2023-24 चा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील निवेदिता सुनिल ताठे यांना प्रदान करण्यात आला. निवेदिता ताठे या आधार बहुउद्देशीय संस्था सोबत महिला व बालक प्रश्नावर मागील अनेक वर्षांपासून संबंधित आहेत.
या गौरव सोहळ्यास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उच्च शैक्षणिक संस्थांचे संचालक, अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, राज्य शासनाचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठाचे अधिकारी ,कर्मचारी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन सहसंचालक डॉ. अर्चना बो-हाडे यांनी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या सहकार्याने व डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *