अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार
1 min read

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार

Loading

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार

मुक्ताईनगर येथे येत्या22 मार्च 2026 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुलमेंन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू मुक्ताईनगर मध्ये दाखल होणार आहेत. ही लीग 3 गटांमध्ये हेणार असून, त्यामध्ये वुमेन्स हलौट (19 वर्ष व त्यापुढील खुला गट 2006 पर्यंत) आणि 2)पंधरा ते अठरा वर्षाचा गट , 3)दहा ते चौदा वर्षे वयोगट
महिलांना सायकलिंग खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या संकल्पनेतून क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग व्हावा व त्यांच्यातील टॅलेंट बघून त्यांची सहाय्यकथा राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग वाढावा यासाठी विविध खेळांच्या अस्मिता निर्देश स्पर्धा चे आयोजन केले जाते. त्यातीलच खेलो इंडिया उपक्रमांतर्गत जळगांव जिल्ह्यात प्रथमच इतक्या नोठ्या प्रमाणात महिलासाठी सायकलिंग स्पर्धा होत. असल्यामुळे खेळाडूसह क्रीडा प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायकलिंग महासंघ, खेलो इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, जिल्हा सायकलिंग असोसिएश जळगांव , जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महीला खेळाडू नी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे आवश्यक त्या सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय सुविधा, नाष्टा जलपान व्यवस्थे पर्यंत सर्व बाबींचा काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक महिला सायकलपटू आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार असून, विजेत्यांना सन्मानचिन्ह/मेडल, प्रमाणपत्र तसेच पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9=00 वाजता केंद्रीय खेड़ा राज्य मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. जिल्ह्यातील नागरिक, क्रीडा प्रेमींनी या त्पर्धेला उपस्थित राहून महिला सायकलपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र मोरे, तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम ,जिल्हा सचिव डॉ. प्रदीप साखरे, महाराष्ट्र चे सचिव प्रा. संजय साठे यानी केले, तसेच स्पर्धा नियोजनासाठी , तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम, तालुका क्रीडा समन्वयक संजीव वाढे, प्राचार्य अनिल पाटील, प्राचार्य वसंत वडसकर, रितेश विजय तायडे ,पुनम बोदडे, अनिल चव्हाण, मोरे सर तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व शाळांचे मुख्याध्यापक , डॉ.संजय निकम, बी एन पाटील, डी. आर. धांडे, मेघश्याम शिंदे, राजू कुलकर्णी, विजय संकेत, दत्तू अहिरे, सुरेश मोरे डी.एम. फेगडे , मयूर महाजन ,संदीप कांडेलकर, मनोज चौधरी, मनीष चौधरी, गायकवाड सर, मोबीन शेख, काम पाहत आहेत. तसेच या सायकलिंग स्पर्धेच्या टेक्निकल बाबींसाठी स्पर्धेसाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे श्री. धर्मेंद्र लांबा सर हे स्पर्धेचे प्रमुख निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्या बरोबर प्रा. साईनाथ थोरात, भिकन अंबे सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *