साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार*
1 min read

साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार*

Loading

*साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार*

जळगांव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्हे)

 

 

 

 

 

जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार तथा साहित्यिक राजू बाविस्कर लिखित ” काळ्या निळ्या रेषा ” आत्मकथनाला सन २०२५ चा सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्या प्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाउंडेशन, जळगाव तर्फे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी वाय.एन. ठोसरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच बाविस्कर सरांच्या अखंड ऊर्जास्त्रोत तथा धर्मपत्नी सौ.भारती बाविस्कर यांनाही शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराचे आयोजक विजय लुल्हे ( सचिव, अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन, जळगाव ) यांनी राजू बाविस्कर यांना पेढा भरवून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ख्यातनाम मुखपृष्ठकार आर्टिस्ट श्यामकांत वर्डीकर , देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष चित्रकार सुनिल दाभाडे , ज्येष्ठ साहित्यिक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक विभाग ), बालकवी राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी / लेखक अशोक कोतवाल, सुनिल कोतकर , टोनी कोतकर मान्यवर उपस्थित होते.
सत्कारा प्रसंगी वाय.एन.ठोसरे म्हणाले की , ” ग्रामसंस्कृती, कुटुंबियांचे संस्कार आणि शिक्षणाची जिद्द याचा सुंदर मिलाफ आत्मचरित्रातून बाविस्करांनी केला आहे ” संयोजक विजय लुल्हे गौरवपर बोलतांना म्हणाले की, ” खेड्यांतील सण परंपरा, धर्मनिरपेक्ष बारा बलुतेदारांची मानव्यता, गुणग्राहक महानुभवांनी सर्वतोपरी कसा आर्थिक संकटात आधार दिला आणि गुणग्राही शिक्षक तसेच मित्रांनी कलेतील स्फुलिंग कसे प्रज्ज्वलित केले…. जळगावला अंगभूत सृजनशील अभिव्यक्तीला भक्कम व्यासपीठ मिळाल्याने जीवनाचे सोने होऊन आयुष्य कसे सार्थकी झाले याचा जीवनमूल्यात्मक प्रवास म्हणजे ” काळ्या निळ्या रेषा ” हे अभिजात आत्मकथन आहे.”
स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमेळ्याचे संस्थापक संजय भावसार यांनीही अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल राजू बाविस्कर यांचा विशेष भावपूर्ण सत्कार केला. याप्रसंगी बाविस्कर यांनी भुतकाळात भावसार यांनी केलेल्या निःस्वार्थी सहकार्याबद्दल व त्यांच्या कलाभिरुचीपूर्ण गुणग्राहकत्वाचे अविस्मरणीय प्रसंग उजागर करताच दोघांचे डोळे आनंदाश्रूंनी भरुन आले आणि भावनिकतेने त्यांनी एकमेकांना गच्च मिठी मारली ! या अजोड मित्र प्रेमाने उपस्थितांचे डोळे पाणावले !!!
नुकतीच रेषा आणि शब्दांचे जादुगार राजू बाविस्कर यांची महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीवर सदस्य म्हणून सन्माननीय निवड झाली आहे.
बाविस्कर यांच्या ” काळ्यानिळ्या रेषा ” या आत्मकथनाला यापूर्वी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार , यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार , लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार , वसंत स्मृती संस्कृती आत्मचरित्र पुरस्कार , अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार , लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार , पद्मश्री दया पवार पुरस्कार , बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संस्थेचा वाङ्गमय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *