महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती*  *अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त,एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा…*
1 min read

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती* *अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त,एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा…*

Loading

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती*

*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त,एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा…*

अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या नव्याने रुजू झालेल्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख मॅडम यांची समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे आणि रामकृष्ण बी.पाटील यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निवेदन देत खालील प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
1) स्पर्श प्रणालीचे काम अद्यावत झाले असून केंद्र हिस्सा थकीत मानधन आज पासून अदा होण्यास सुरुवात होणार असून या आठवड्यात सर्व थकित मानधन अदा केले जाईल.
2) प्रोत्साहन भत्ता मानधनासोबत जोडण्याबाबत विचारविनिमय सुरू असून त्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
3) उन्हामुळे अंगणवाडीच्या वेळेबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत.
4)अंगणवाडी सेविका मदतनीसांचे थकीत प्रवास भत्ते बिल,मोबाईल रिचार्ज आदी थकीत रकमा लवकरच अदा करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
5) केंद्र सरकारच्या सूचनेनंतर एक महिना उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल असे आयुक्तांनी चर्चेत सांगितले.
या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त कार्यालय सकारात्मक असल्याचेही आयुक्त यांनी चर्चेत सांगितले असल्याची माहिती राज्य समन्वय समितीचे संजय मापले,जयश्री वाबळे, राजू पाटील, अमोल बैसाणे, वकील पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *