पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण
1 min read

पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण

Loading

 

*पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न*

पाचोरा  प्रतिनिधी- इयत्ता चौथी व सातवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा चालू शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.पाचोरा तालुक्यातील सर्व शाळांचे सुमारे दोन हजार चारशे विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पाचोरा शिक्षण विभागाने शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केली होती. मिशन स्कॉलरशिप कार्यशाळेला गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, राजेंद्र पाटील सर, सुभाष देसले सर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजू राठोड यांनी केले. आभार विजय ठाकूर यांनी मानले. मिशन स्कॉलरशिप समन्वयक सुभाष देसले सर यांनी परीक्षेचे स्वरूप, विविध युक्त्या, क्लुप्त्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शिक्षकांना केले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन करतांना प्रत्येक शाळेत शिष्यवृत्ती सराव घेणे त्यासोबत पर्यावरण शिक्षण, आरोग्य शिक्षण तासिका घेणे, असाक्षर वर्ग सुरु करणे या सूचना दिल्या.शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्व विषद केले. सदर कार्यशाळेत पी एच डी संपादन केल्याबद्दल शिक्षक डॉ मधु गुमाडे, तसेच बंजारा भाषिक अभ्यासक्रम पुस्तिका तयार केल्याबद्दल संजू राठोड यांचा तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झाल्याबद्दल राजेंद्र राठोड, विद्या जोशी, दिनेश तेली, चारूलता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.उर्दू शाळेतील रोजेदार विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले.कार्यशाळा यशस्वितेसाठी केंद्र प्रमुख कदीर सर उर्दू शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *