पुज्य बालकनाथ महाराजांच्या हस्ते ‘श्रीनाथ मोबाईल’चा भव्य शुभारंभ; व्यापारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
1 min read

पुज्य बालकनाथ महाराजांच्या हस्ते ‘श्रीनाथ मोबाईल’चा भव्य शुभारंभ; व्यापारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

Loading

पुज्य बालकनाथ महाराजांच्या हस्ते ‘श्रीनाथ मोबाईल’चा भव्य शुभारंभ; व्यापारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स, मुख्य बाजारपेठ येथे ‘श्रीनाथ मोबाईल’ या मोबाईल व्यवसाय केंद्राचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ओम चैतन्य नवनाथ आश्रम, कोळपिंपरी (ता. पारोळा) येथील पुज्य बालकनाथ महाराज यांच्या शुभहस्ते या नवीन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी इच्छापूर्ती दत्तधाम ट्रस्ट, अमळनेरचे संस्थापक श्री. निलेश दादा महाराज तसेच मोबाईल व्यापारी असोसिएशन अमळनेरचे अध्यक्ष प्रविण बी. महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मोबाईल व्यापारी, मित्रपरिवार, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनाथ मोबाईलचे संचालक तुषार एकनाथ नाथबुवा व समाधान सदाशिव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. शुभारंभानंतर उपस्थितांनी नव्या व्यवसायाला भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की, ‘श्रीनाथ मोबाईल इन्स्टिट्यूट’ अनेक वर्षांपासून मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात कार्यरत असून अमळनेर व परिसरातील अनेक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या क्षेत्रात युवकांना नवे व्यासपीठ मिळत असून मोबाईल व्यापार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होत आहे.

कार्यक्रमाला मोबाईल व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य शुभारंभामुळे अमळनेरच्या व्यापारी क्षेत्रात आणखी एक नवे केंद्र सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *