ग्रामीण महिलांनी घेतले कॉम्प्युटर चालविण्याचे धडे , महिलांना कॉम्प्युटर प्रशिक्षणातून डिजिटल सक्षमीकरण
![]()
ग्रामीण महिलांनी घेतले कॉम्प्युटर चालविण्याचे धडे , महिलांना कॉम्प्युटर प्रशिक्षणातून डिजिटल सक्षमीकरण
अमळनेर : आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामिनी प्रकल्पांतर्गत उमेद अभियानात कार्यरत समुदाय साधन व्यक्ती (CRP) महिलांसाठी मोफत बेसिक कॉम्प्युटर कोर्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना त्यांच्या कामा चा भाग म्हणून सतत माहिती पाठवणे, विविध प्रकारचे रिपोर्ट तयार करणे हे काम मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल मधून करावे लागते, या कमी मदत व्हावी महिला जास्तीत जास्त डिजिटल साक्षर व्हाव्या हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमांतर्गत १२ दिवसीय बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एकूण ३५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना एम.एस. वर्ड एम एस ऑफिस, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तसेच विविध प्रकारच्या आधुनिक एआय (AI) टूल्स बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्ये म्हणजे महिलांसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देण्यात आले तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात कॉम्प्युटरवर सराव करण्याची संधीही देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाच्या सांगता समारंभास , आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होत्या. उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक सीमा रगडे व तालुका व्यवस्थापक ज्योती भावसार उपस्थित होत्या,डॉ. भारती पाटील यांनी महिलांना आर्थिक स्वावलंबन व उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सीमा रगडे यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.
प्रशिक्षक तुषार चौधरी आणि सुमित पाटील यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मुरलीधर बिरारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी सूर्यवंशी व उर्जिता शिसोदे यांनी सहकार्य केले.


