लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन व सी ए कल्पेश बाविस्कर यांचा गौरव.*
1 min read

लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन व सी ए कल्पेश बाविस्कर यांचा गौरव.*

Loading

 

*लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन व सी ए कल्पेश बाविस्कर यांचा गौरव.*

लोकमान्य विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याच्या स्मरणार्थ पुण्यतिथी साजरा करण्यात आली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाचा माजी विद्यार्थी कल्पेश दिपक बाविस्कर हे नुकतीच सी ए परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
लोकमान्य विद्यालयाने आतापर्यंत शेकडो विद्यार्थी घडविले. ते आज विविध क्षेत्रामध्ये आपल्या शहराचं व विद्यालयाचे नाव उंचावत असताना दिसत आहेत. आज अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल,वाणिज्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचा विद्यालयास सार्थ अभिमान आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर भाषण करताना संदिप महाजन सर यांनी सावित्रीबाईंचा जीवनपट, त्यांचे उल्लेखनीय शैक्षणिक , सामाजिक कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले व प्लेगच्या साथीत जनसेवा करत असताना ओढवलेला मृत्यू. एकंदरीत सावित्रीबाई फुले या त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यामुळे आजरामर झाल्या असे प्रतिपादन केले.

तर सी ए हा एक प्रतिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.जो भारतात, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टरेड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) घेतो.थोडक्यात, CA हा वित्त, कर आणि लेखा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा व मानाचा व्यवसाय आहे. या विषयाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने कल्पेश बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तर मुख्याध्यापक जे के चौधरी सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईने आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतांना दिसत आहे. त्यांचे ऋणनिर्देश करणे हे आपलं कर्तव्य आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाचा माजी विद्यार्थी, सी ए कल्पेश बाविस्कर यांचे विद्यालयाच्या वतीने कौतुक केले व भावी आयुष्यात उल्लेखनीय कार्य करण्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे के चौधरी सर, ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन सर, दादासो दीपक बाविस्कर व प्रमुख अतिथी सी ए कल्पेश बाविस्कर आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ सायली देशपांडे मॅडम यांनी केले, तर श्रीमती रेखा कामळे मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *