अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील; नव्या कार्यकारिणीची घोषणा उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दोन तरुणांना शहरप्रमुखपदाची संधी; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीवर भर
![]()
अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर
अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील; नव्या कार्यकारिणीची घोषणा
उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दोन तरुणांना शहरप्रमुखपदाची संधी; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीवर भर
अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास मोठी चालना मिळणार आहे.
नवीन नियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
गुलाब काशिनाथ पाटील – तालुका प्रमुख, अमळनेर
विलास सुकदेव कंखरे – शहर अध्यक्ष (10/18)
भरत प्रकाश पवार – शहर अध्यक्ष (1/9)
सुरेश अर्जुन पाटील – विधानसभा क्षेत्र प्रमुख
प्रथमेश मधुकर पवार – उपजिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र – अमळनेर विधानसभा)
पक्ष संघटना अधिक प्रभावीपणे उभारण्यासाठी व तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे सर्व पदाधिकारी काम करणार आहेत.
शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पदाधिकारी कटिबद्ध राहतील, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या नियुक्त्यांमागे अमळनेर
तालुक्याचे माजी आमदार शिरीष दादा चौधरी
नामदार गुलाबराव भाऊ पाटील
पाणीपुरवठा मंत्री तथा
पालकमंत्री जळगांव
श्री. वासुदेव पाटील जिल्हाप्रमुख
शिवसेना
सौ. सरीताताई माळी विभागीय अध्यक्ष महिला आघाडी
आमदार श्री.किशोर आप्पा पाटील पाचोरा आमदार
श्री.आमदार अमोल दादा पाटील पारोळा


श्री.चंद्रकांत आण्णा सोनवणे चोपडा आमदार
श्री.चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर आमदार
श्री.उन्मेष दादा पाटील मा.खासदार चाळीसगाव
यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी निर्णायक ठरली आहे. त्यांच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांना योग्य संधी आणि न्याय मिळत असल्याची भावना स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली. त्यामुळे अमळनेर विधानसभा क्षेत्रात शिवसेना अधिक जोमाने उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! 🚩

