जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान ,  अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार
1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान , अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

Loading

 

जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान

अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

भडगाव प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील स्त्रियांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करण्यात आला.

लहानग्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व संस्कारांचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कल्पना दिलीप खैरनार (सेविका), सुनीता दगडू शिंपी (सेविका), उज्वला निवृत्ती वानखेडे (सेविका), योगिता विक्रम चौधरी (सेविका), मीनाक्षी दिलीप जोशी (सेविका) आणि रूपाली राहुल मणियार (मदतनीस) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अंगणवाडीच्या सीडीपीओ सौ. जिजा राठोड, भारती रवींद्र इंगळे (मदतनीस), अरुणा सुखदेव पवार (सेविका), सुशीला यादव महाजन (मदतनीस) तसेच विद्यार्थी व बालगोपाल उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *