पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे
1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी-धूलिवंदन उत्साहात साजरे

 

अमळनेर प्रतिनिधी : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला.
संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते विधीपूर्वक होळी पूजन करण्यात आले व होळीचे दहन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळी सणाचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, होळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे. हिरण्यकश्यपूवर भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. तसेच होळी हा रंग, प्रेम, बंधुता आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणारा लोकप्रिय हिंदू सण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरी केली. आनंद, उत्साह आणि मैत्रीच्या वातावरणात रंगोत्सव रंगला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उत्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, विजय चौधरी व सखाराम पावरा यांनी विशेष सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, संस्कार आणि उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *