अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर
1 min read

अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर

Loading

अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर

धुळे प्रतिनिधी :
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मार्फत देशभरातून घेण्यात येणाऱ्या अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या सीए अंतिम परीक्षेत कु. साक्षी योगेश पाटील हिने घवघवीत यश संपादन करत चार्टर्ड अकाउंटंट ही मानाची पदवी मिळवली आहे. या उल्लेखनीय यशामुळे चाळीसगाव, धुळे व जळगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

साक्षी पाटील या चाळीसगाव येथील नामांकित राष्ट्रीय विद्यालय संस्थेचे संचालक स्व. जालाम बापू पाटील यांची नात असून दिवंगत ॲड. योगेश पाटील यांची कन्या आहेत. तसेच शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील व ॲड. विवेक सूर्यवंशी यांची त्या मानस कन्या आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या कुटुंबातून येत असतानाही साक्षीने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.

दिनांक १ मार्च रोजी देशभरातून सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा टक्क्यांच्या आसपास लागतो. अशा कठीण स्पर्धेत साक्षी पाटील हिने यश मिळवत सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली, ही अभिमानास्पद बाब आहे.

विशेष म्हणजे, शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच एका वर्षाच्या अंतराने वडिलांचे आणि आजोबांचे अकस्मात निधन झाले. या दुहेरी आघाताने कोणीही खचून गेले असते; मात्र साक्षीने दु:खाला न जुमानता धैर्य, चिकाटी आणि प्रचंड परिश्रम यांच्या जोरावर अभ्यास सुरू ठेवला. कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तिने यशाला गवसणी घालत कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले.

तिच्या या यशाबद्दल चाळीसगाव, धुळे आणि जळगाव परिसरातून विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयाप्रती निष्ठा ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, याचे प्रेरणादायी उदाहरण साक्षी पाटील यांनी घालून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *