मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
1 min read

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

Loading

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

 

एरंडोल : दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा सुप्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन एरंडोल नगर वाचनालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भाषिक समृद्धीसाठी विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, चिंतन,वाचन,लेखन व भाषण या जाणिवा वाढीस लागाव्या यासाठी *मराठी भाषा खरोखर अभिजात आहे* या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी आपले दोन दोन विद्यार्थी स्पर्धक प्रतिनिधी पाठवून सहकार्य केले.स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले दमदार सादरीकरण करीत श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली.सदर स्पर्धेत विद्यार्थिनींचा सहभाग हा लक्षवेधी ठरला.दोन तास चाललेल्या या सादरीकरणाने मराठी भाषेच्या थोरवीने श्रोते मनस्वी भारावले.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली रा.ति. काबरे विद्यालयाची कु.अभिलाषा समाधान पाटील तर दुसरा क्रमांक रा.ति.काबरे विद्यालयाने बाजी मारीत कु.वैष्णवी राजू महाजन या विद्यार्थिनीने मिळविला.तर तिसऱ्या क्रमांकाचा मान गोपी गोल्ड स्कूलची विद्यार्थिनी कु.दीप्ती विजयसिंग पाटील हिने मिळविला.तसेच उत्तेजनार्थ म्हणून कु.खुशी कल्याण पाटील ही जिजामाता माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी बक्षीस पात्र ठरली.सर्व विजयी स्पर्धकांना वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या व संचालकांच्या शुभहस्ते प्रमाण पत्रासोबत वाचनीय पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.सदर स्पर्धा समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.जगन्नाथ देविदास ठाकूर यांची उपस्थिती होती.तर व्यासपीठावर वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे, श्री.चिटणीस रवींद्र चिंतामण लालगे,सहचिटणीस श्री.संतोष वेडू वंजारी,संचालक श्री.प्रवीण आधार महाजन,संचालक श्री.गुरुदास तुकाराम पाटील,संचालक श्री.परेश किशोर बिर्ला,संचालक श्री.डॉ.प्रेमराज गंगाधर पळशीकर यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सर्वस्पर्शीत्व जपणारे सूत्र संचालन पत्रकार तथा वाचनालयाचे संचालक श्री प्रवीण आधार महाजन यांनी केले.
याप्रसंगी प्रा. वा. ना.आंधळे यांनी मराठी भाषेच्या थोरवीसह स्पर्धकांच्या वाकपटूत्वाचे कौतुक केले.तर श्री.रवींद्र चिंतामण लाळगे यांनी मराठी भाषेच्या एकूणच सौंदर्यावर सखोल चिंतन सादर केले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे प्राचीनत्व आणि भाषेचा विपुल शब्दसाठा मांडून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे भाषेवरील प्रेम व भाषा संवर्धनासाठी केलेले कार्य याविषयी सूतोवाच केले.
सदर स्पर्धेचे परीक्षण श्री. सुधीर मोतीराम साळुंखे,श्रीमती सुचेता सुभाष साळुंखे,सौ. ज्योती मंदार वडगावकर व श्री.विशाल काळे या शिक्षक बंधू भगिनींनी केले.
परीक्षकांना धन्यवाद देत वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल श्री.देवेंद्र संतोष वंजारी,लिपिक श्री.संजय बाळकृष्ण अग्निहोत्री,शिपाई श्री.गोकुळ अरुण मोरे,वाचक व नित्य मदतनिस श्री.अमोल अशोक काबरा यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन प्रवीण आधार महाजन यांनी करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *