अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी*
![]()
*अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी*
जळगाव: येथील अनुसूचित जाती विकास संघ चे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्यातर्फे अनुसूचित जातीच्या लोकांना धान्य मोफत वाटप करून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम ढिवरे होते. याच वर्षी स्थापन झालेल्या अनुसूचित जाती विकास संघाचा पहिलाच उपक्रम होता. कार्यक्रमाला जळगाव शहरातील मान्यवर उपस्थित होते. शहरातील अनुसूचित जातीच्या भागात जाऊन 500 किलो धान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम हा अत्यंत साध्या पद्धतीने घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन अनुसूचित जाती विकास संघाचे संघसेवक अजय जाधव यांनी केले होते.

