अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान
1 min read

अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान

Loading

अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान

जळगाव : येथील सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी केंद्र येथे अनुसूचित जाती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्याकडून २० लोकांमार्फत मोफत रक्तदान करण्यात आले. आपण समाजाचे देणे लाभतो या उद्देशाने संस्था निस्वार्थीपणे काम करत असते असे यावेळी मिथुन ढिवरे यांनी मनोगत व्यक्त केले. या रक्तदानामध्ये संघसेवक अजय जाधव, मिथुन ढिवरे, आनंद ढिवरे, अंश रंधे, राजेश बिहाडे, सुभाष सपकाळे, मुकेश जाधव, चंद्रकांत सपकाळे, प्रवीण जंजाडे आदी लोकांचा समावेश होता. सिव्हिल हॉस्पिटल मधील रक्तपेढी सेंटरचे डॉक्टर राम चौबे आणि टेक्निशियन मनोज पाटील यांनी संपूर्ण रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण केली. सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी सेंटर कडून अनुसूचित जाती विकास संघाचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *