स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा’ – सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना संदेश , २२६ गुणवंत पाल्यांचा चांदीच्या नाण्यांनी सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी समारंभ
![]()
‘स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा’ – सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना संदेश
२२६ गुणवंत पाल्यांचा चांदीच्या नाण्यांनी सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी समारंभ
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)
वारंवार आपले कौतुक करुन घ्यायचे असेल तर विदयार्थ्यानी अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन करावे. चांगली संगत ठेवावी जीवनात चांगली निती व मुल्य जपावीत. आई वडीलांवर अवलंबून न राहता आपली स्वतःची स्वतंत्र प्रतिमा तयार करावी. असा सल्ला विविध छोटया गोष्टी व यशस्वी लोकांची उदाहरणे देऊन सेवानिवत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीच्या वतीने आयोजित गुणवंत विदयार्थी व सभासद समारंभप्रसंगी दिला.
जिल्हा नियोजन समिती सभागहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या त्यांनीही संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे, ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष उदय पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त डॉ. विलास नारखेडे, शासनाचा गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त सिमा माळदकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ. सिमा सैंदाणे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभासदांच्या २२६ गुणवंत पाल्यांना १० ग्रॅम चांदीचे नाणे व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन करुन यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. पालकांचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी समन्वय समितीचे अध्यक्ष यु.यु. पाटील, माजी अध्यक्ष आर. एच. बाविस्कर, संभाजी पाटील, गोपाळ पाटील, प्रा. सुनील गरुड, एच.जी. इंगळे, सी.सी. वाणी, साधना लोखंडे, पुष्पा पाटील, एस. के. पाटील, एन. ओ. चौधरी, अरुण सपकाळे यासर विविध संघटनांचे पदाधिकारी, पतपेढीचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सोनम पाटील यांनी केले तर आभार मानद सचिव भगतसिंग पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन परमेश्वर रोकडे यांनी केले.

यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
पतपेढीच्या अध्यक्षा श्रीमती सोनम शिवाजी पाटील, उपाध्यक्षा श्रीमती वैशाली मुरलीधर महाजन, मानद सचिव भगतसिंग पाटील, खजिनदार डॉ. संजय निकम यांनी केले आहे.
तसेच संचालक व कार्यकारी मंडळाचे सदस्य अजयकुमार पाटील, संदीप घुगे, सिद्धेश्वर वाघुळदे, शैलेश राणे, आबा पाटील, डिगंबर पाटील, सचिन पाटील, दगडू पाटील, मनोहर सूर्यवंशी, शालिग्राम भिरूड, जानकीराम सपकाळे, जगदीश पाटील, तुषार बोरसे, भावेश अहिरराव, संजयकुमार सांगळकर, हेमंत चौधरी, संजय सोनवणे, डिगंबर पाटील, किरण पाटील, राजेंद्र महाजन, सुनील महाजन यांनी प्रयत्न केले.

