नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्यु. कॉलेज , जळगांव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रम संपन्न……….
![]()
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्यु. कॉलेज , जळगांव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रम संपन्न……….
जळगांव प्रतिनिधी
आज दि.२८/०२/२०२६ रोजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला डॉ. सी . व्ही . रमण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या सी. सी. पाटील मॅम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती एस. एम. राणे मॅम, विद्यालया चे पर्यवेक्षक श्रीयूत. व्ही. एस. सैंदाणे सर, विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ. बी. एस. राणे मॅडम, सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थिनींनी कु टिना काकडे हीने सी.व्ही. रमण यांचा जीवन परिचय बद्दल माहिती दिली, रितू पाटील ही ने सी.व्ही. रमण यांनी लावलेली शोध. दिपीका गंगावणे ही ने विज्ञान बद्दल माहीती, पूर्वा प्रजापत ने रमण यांचा कार्यओळख, सिमरन सोनवणे विज्ञाना मूळे आपल्या जीवनावर खुप मोठा परिणाम झाला आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर्या पाटील, सिमरन सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक श्री. व्ही. बी. महाजन, सौ. ए. एस . चौधरी मॅम ,सौ. जे. पी. भंगाळे मॅडम, सौ. एन.पी. चौधरी मॅम , सौ के. जे सावदेक र , सौ. एम व्ही फिरके मॅम, यांचे देखील सहकार्य लाभले. आणि कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला….

