यादों की महफिल” – सुरेल स्वरांतून धर्मेंद्रजी आणि लतादीदींना भावपूर्ण आदरांजली!  स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर यांचा अविस्मरणीय संगीत सोहळा
1 min read

यादों की महफिल” – सुरेल स्वरांतून धर्मेंद्रजी आणि लतादीदींना भावपूर्ण आदरांजली! स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर यांचा अविस्मरणीय संगीत सोहळा

Loading

“यादों की महफिल” – सुरेल स्वरांतून धर्मेंद्रजी आणि लतादीदींना भावपूर्ण आदरांजली!

स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर यांचा अविस्मरणीय संगीत सोहळा

अमळनेर प्रतिनिधी:
रुपेरी पडद्यावर आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि बहारदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनय सम्राट स्वर्गीय धर्मेंद्रजी आणि आपल्या अमृतमय, सुरेल स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर (लतादीदी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी “स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर” सादर करीत आहे एक खास सुरेल कार्यक्रम — “यादों की महफिल”.

धर्मेंद्रजींच्या अभिनयातून अजरामर ठरलेली आणि लतादीदींच्या गोड, कोमल स्वरांनी सजलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक गीते या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. जुन्या सुवर्णकाळातील या गीतांची मैफल रसिकांना पुन्हा एकदा त्या मधुर आठवणींच्या प्रवाहात घेऊन जाईल.
दिनांक: 1 मार्च 2026
वेळ: सायं. 6:00 वाजता
स्थळ: जुना टाऊन हॉल, अमळनेर
या कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण पुढील कलावंतांकडून करण्यात येणार आहे –
श्री. किशोर देशपांडे, श्री. मिलिंद पाटील, श्री. प्रदीप शिंगाणे, श्री. देविदास बिरारी,
सौ. नेहा देशपांडे, सौ. युगछाया शिंगाणे, सौ. विद्या पाटील आणि सौ. पूनम अग्रवाल.

संगीतप्रेमींसाठी ही एक अनमोल पर्वणी ठरणार असून, स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करताना आठवणींचा एक सुरेल प्रवास अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
अमळनेरकर रसिकांनी या अविस्मरणीय “यादों की महफिल”ला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *