महाराष्ट्र भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन”, मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे प्रतिमापूजनाने साजरा उत्सव
1 min read

महाराष्ट्र भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन”, मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे प्रतिमापूजनाने साजरा उत्सव

Loading

“महाराष्ट्र भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन”

मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे प्रतिमापूजनाने साजरा उत्सव

अमळनेर (दि. २७ फेब्रुवारी २०२६) :

मराठी भाषेच्या अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा “महाराष्ट्र भाषा गौरव दिन” मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाकवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विवेकानंद भांडारकर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष श्री. प्रा. देशपांडे, चिटणीस श्री. श्याम पवार तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. सोमनाथ ब्रम्हे, भागवत गुरुजी, श्री. अजय केले, अॅड. कुलकर्णी, डॉ. महेश पाटील आणि अनेक वाचक उपस्थित होते.

कार्यक्रमात मराठी भाषेची समृद्ध परंपरा, कुसुमाग्रजांचे साहित्यिक योगदान आणि त्यांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली प्रेरणा यावर उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. मराठी भाषेचा गौरव जपण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

मराठी भाषेचा अभिमान जागवणारा हा सोहळा साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *