संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार  संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे  संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले
1 min read

संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले

Loading

संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार

संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे

संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले

मुंबई (प्रतिनिधी) शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेमुळे हजारो विद्यार्थ्यांची गळती होणार असल्याने या प्रश्नाकडे शासनाने सामाजिक प्रश्न म्हणून बघून जीआर मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी आज संच मान्यते विरोधात झालेल्या एल्गार सभेत शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली
संचमान्यतेच्या विरोधात आज शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी भांडूप मधील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयच्या सभागृहात आयोजित केलेल्या एल्गार सभेत अनिल बोरनारे बोलत होते यावेळी शिक्षक महासंघाचे पदाधिकारी भानुदास माने प्रदिप शिंदे राहुल पाटील प्रमोद बाविस्कर केशव मालुंजकर सुभाष अंभोरे विजय धनावडे संतोष मेढे भगवान सागर अनिल मुंडे प्रवीण मुळीक सीमा देसाई आरती गुंजाळ सरला काकड यासह मुंबई कोकण विभागातील अनेक संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुंबईतील मराठीसह उर्दू हिंदी व अन्य माध्यमांच्या शाळेत इयत्ता ९ वी व १० वीच्या तुकड्यामध्ये विद्यार्थी असूनही संचमान्यते मध्ये शून्य संख्या दाखविली जात असल्याने शाळा विद्यार्थी असूनही ओस पडतील मुंबईच्या झोपडपट्टी मधील शाळा व कोकणातील दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाऊन सामाजिक प्रश्न निर्माण होतील विशेषतः मुली शाळाबाह्य होण्याची भीती अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली
मुंबई कोकणातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या असूनही केवळ आधार अपडेट नसल्याने अनेक विद्यार्थी संचमान्यतेत न दाखवील्यामुळे शून्य शिक्षक संख्या दर्शविली असल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत
या सभेत मुंबईतील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले मनोगते व्यक्त करून संचमान्यतेला विरोध दर्शवीला

तर राज्यात तीव्र आंदोलन
संच मान्यते दुरुस्ती होऊन इयत्ता नववी व दहावीला प्रत्येक विषयाला विद्यार्थ्यांची अट न टाकता शिक्षक दिले नाही तर आझाद मैदानात धरणे आंदोलन करून राज्यभरात प्रत्येक जिल्हाधिकार्यालयासमोर समोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अनिल बोरनारे यांनी शासनाला दिला

शिक्षक आमदारानी सभागृहात प्रश्न सोडवावा

विधीमंडळाचे अर्थासंकल्पिय अधिवेशन सुरू असून राज्यातील शिक्षक मतदार संघातील ७ व पदवीधर मतदार संघातील ७ अशा १४ लोकप्रतिनिधी नी एकत्र येऊन प्रश्न सोडवावा असे आवाहन या एल्गार सभेत अनिल बोरनारे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *