गुणवंतांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान — जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा १ मार्चला
![]()
गुणवंतांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान — जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा १ मार्चला
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)
– शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती कार्यालय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे गुणवंत सभासद पाल्य पारितोषिक वितरण समारंभ व सभासद सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
पतपेढीच्या वतीने विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्यात येणार असून, आदर्श शिक्षक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सभासदांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षक-सभासदांच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पतपेढीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती स्मिताताई वाघ, खासदार जळगाव लोकसभा मतदारसंघ, विराजमान राहणार आहेत.
सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ दीपमाला काळे, महापौर जळगाव शहर महानगरपालिका, यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी किशोर भाऊ दराडे, आमदार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ, डॉ. श्री सुधीर तांबे, माजी आमदार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ, राजू मामा भोळे, आमदार जळगाव, तसेच अमोल जावळे, आमदार यावल-रावेर विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आप्पासो निळकंठराव गायकवाड, सेवानिवृत्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, निलेश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. जळगाव, तसेच श्रीमती कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जळगाव उपस्थित राहणार आहेत.
पतपेढीच्या माध्यमातून केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने केले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या यशाला मिळणारी प्रेरणा असून, इतर विद्यार्थ्यांसाठी ती दिशादर्शक ठरते. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा, शैक्षणिक परीक्षा आणि गुणवत्तापरीक्षणात मिळविलेल्या यशाचा हा सामूहिक गौरव सोहळा ठरणार आहे.
या कार्यक्रमास विविध स्पर्धांमध्ये प्रथम आलेले सभासद पाल्य, आदर्श शिक्षक, संतोषी प्राप्त विद्यार्थी-पालक तसेच सर्व सभासद बांधव-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतपेढीच्या अध्यक्षा श्रीमती सोनम शिवाजी पाटील, उपाध्यक्षा श्रीमती वैशाली मुरलीधर महाजन, मानद सचिव भगतसिंग पाटील, खजिनदार डॉ. संजय निकम यांनी केले आहे.
तसेच संचालक व कार्यकारी मंडळाचे सदस्य अजयकुमार पाटील, संदीप घुगे, सिद्धेश्वर वाघुळदे, शैलेश राणे, आबा पाटील, डिगंबर पाटील, सचिन पाटील, दगडू पाटील, मनोहर सूर्यवंशी, शालिग्राम भिरूड, जानकीराम सपकाळे, जगदीश पाटील, तुषार बोरसे, भावेश अहिरराव, संजयकुमार सांगळकर, हेमंत चौधरी, संजय सोनवणे, डिगंबर पाटील, किरण पाटील, राजेंद्र महाजन, सुनील महाजन यांनीही सर्व सभासदांनी या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव आणि शिक्षकांचा सन्मान यांचा सुंदर संगम असलेला हा सोहळा जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

