प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाची गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस ज्ञानयात्रा; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी शैक्षणिक अनुभव
1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाची गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस ज्ञानयात्रा; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी शैक्षणिक अनुभव

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाची गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस ज्ञानयात्रा; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी शैक्षणिक अनुभव

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस भेट दिली.ही भेट शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, केवळ दैनंदिन पाठ्यपुस्तकाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून देखील अभ्यास केला पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत शैक्षणिक सहल उपयुक्त होती. या शैक्षणिक सहलीचा हेतू म्हणजे प्राचीन भारतीय कला व स्थापत्य कलेचा सूक्ष्म पद्धतीने पाहणी करून अभ्यास करणे, ऐतिहासिक स्थळाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व त्यांच्या जतनाची भावना वृद्धिगत करणे ही होती. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थी गांधी तीर्थ येथे पोहोचले.त्यांनी त्या ठिकाणी गांधी जीवन तत्त्वज्ञान, गांधींचे एकूण कार्य,गांधींचे स्व-अनुभव, मोहन ते महात्मा या ऑडिओ क्लिपचे घेतलेले अनुभव, ‘खोज गांधीजी की’ या मासिकाचे अध्ययन, गांधी तत्त्वज्ञान यावर आधारीत मासिके हे अनेक भाषा मधून विद्यार्थ्यांना अधिक वाचण्यासाठी उपलब्ध होती, त्याचे विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. गांधी तत्त्वज्ञान हे डिजिटल माहितीपटातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. सत्य,अहिंसा, स्वदेशी व स्वालंबन ही चतु:सूत्री विद्यार्थ्यांनी विविध चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समजून घेतली. आत्मसाक्षात्कार, नैतिक कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने गांधी तीर्थ भेट उपयुक्त होती.
विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजता अजिंठा लेणीची पाहणी केली तिथे भेट देऊन प्राचीन स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून अनुभवले.
ही अजिंठा लेणी इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. सहाव्या शतकापर्यंत तयार करण्यात आले. दगडाचं कोरलेले भव्य बुद्धमूर्ती,सूक्ष्म शिल्पकला, रंगीत भीतीचित्रे, विविध जातकथांचे चित्रण, वाघूर नदीच्या खोऱ्यात वसलेल्या लेण्यांचे नैसर्गिक सौंदर्य हे अनेक विद्यार्थ्यांना मंत्र:मुग्ध करणारे होते. विद्यार्थ्यांनी त्या एक दिवशीय शैक्षणिक सहलीत गांधी तीर्थ पाहून राष्ट्रपुरुषांच्या सूक्ष्म कार्यांची माहिती मिळवली, त्यातून त्यांना शाश्वत विचाराची प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे अजिंठा लेणीतून भारतीय कला व संस्कृतीचा इतिहास,भारतीय ज्ञान परंपरेच्या स्वरूपात अभ्यासाची संधी उपलब्ध झाली म्हणून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा प्रत्यक्ष पाहणी व अभ्यासातून अनुभव व आनंद घेतला. ही सहल ज्ञानवर्धक व प्रेरणादायी स्वरूपाची होती, असे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव यावेळी व्यक्त केले.
प्रस्तुत शैक्षणिक सहलीकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एच.डी.जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. राज्यशास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ.संदीप नेरकर, डॉ.सुनील राजपूत, डॉ.राखी घरटे,
प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर या सर्वांनी शैक्षणिक सहलीसाठी परिश्रम घेतले आणि सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *