राष्ट्रीय स्तरावरील “proJIT–2026 – राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन” मध्ये आय.एम.आर.डी.च्या विद्यार्थ्याचे दैदिप्यमान यश
1 min read

राष्ट्रीय स्तरावरील “proJIT–2026 – राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन” मध्ये आय.एम.आर.डी.च्या विद्यार्थ्याचे दैदिप्यमान यश

Loading

राष्ट्रीय स्तरावरील “proJIT–2026 – राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन” मध्ये आय.एम.आर.डी.च्या विद्यार्थ्याचे दैदिप्यमान यश

शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील
आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेच्या तृतीय वर्ष बी.सी.ए. अभ्यासक्रमातील विद्यार्थी पियुष वासुदेव भोई याने राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून
परिसंस्थेचा गौरव वाढवला आहे. “ProJIT–2026 – राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन” या स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पियुष भोई याने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करत उल्लेखनीय यश मिळवले.
या भव्य राष्ट्रीय स्पर्धेत पियुष भोई याने पुढीलप्रमाणे यश संपादन केले –
• रोबो रेस – प्रथम क्रमांक
• रोबो सॉकर – प्रथम क्रमांक
• रोबो सुमो –द्वितीय क्रमांक
ही स्पर्धा यांत्रिकी, स्वयंचलन (ऑटोमेशन), रोबोटिक्स तसेच विविध तांत्रिक गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. विशेष आकर्षण म्हणून आयोजित रोबो रेस, रोबो सॉकर, रोबो वार, ब्रिज मेकींग,सी-कोड, वेब डिजाईन, रिल रंबल इत्यादी
उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सदर स्पर्धा शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथे जवाहर एज्युकेशन सोसायटी चे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रीय स्तरावर विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांमध्ये झालेल्या या स्पर्धेत पियुष ने उत्कृष्ट कामगिरी करत परिसंस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
त्याच्या या यशासाठी श्री. प्रथमेश माळी (Founder – STEMSAGE techworld, Shirpur & Mentor of Team VhyuAstra Robotics) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष मा. भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, सचिव राजगोपालजी भंडारी (आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट), सचिव रेषा पटेल (शिरपूर
एज्युकेशन सोसायटी), संचालक अतुलभाऊ भंडारी (शिरपूर एज्युकेशन सोसायटी), परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील,सहायक संचालक व एम.सी.ए. विभागप्रमुख डॉ. मनोज बेहेरे, आयक्युएसी समन्वयक डॉ. मनोज पटेल तसेच पदवी
विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी पियुषचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशामागे प्रा. प्रियंका सैंदाणे, प्रा. महेश भावसार व प्रा. विजेता सोनगीरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आय.एम.आर.डी. परिसंस्था शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *