अनाहत चक्राला जागृत करण्याची शक्ती संगीतामध्ये – ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
अनाहत चक्राला जागृत करण्याची शक्ती संगीतामध्ये – ज्येष्ठ समाजसेवक,
प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
उरुळी कांचन (तुपे वस्ती): संगीत म्हणजे स्वर, ताल, लय यांचा मिलाप आहे. भारतीय संगीताचे प्रकार अनेक असून त्यापैकी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत हे महत्त्वाचे आहे. संगीतामुळे मन प्रसन्न राहुन तणाव कमी होतो. भारतीय संगीत ,अति प्राचीन असून वैविविधता पूर्ण आहे, त्यात ध्वनीच्या माध्यमातून भावना जागृत करण्याची अद्भुत क्षमता आहे. हिंदू धर्मात चार वेद ,सहा शास्त्रे, 18 पुराण यांच्या समवेत 64 कला सांगितल्या आहेत. अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये संगीताचा वापर होतो.त्यापैकी संगीत एक महत्त्वाची कला आहे. संगीतामुळे गायन, वादन व नृत्याच्या माध्यमातून भावना जागृत होतात. संगीतामुळे मानसिक ,शांतता भावनिक अभिव्यक्ती ,तणाव मुक्ती सांस्कृतिक विकास ,साधला जातो. मानसिक शांततेसाठी संगीत म्युझिक थेरपी महत्त्वाची आहे. संगीत एक मनोरंजन नसून मानवी जीवनाला परिपूर्ण व समृद्ध करणारी एक कृतीशील शक्ती आहे. संगीतामुळे शरीरातील पंचतत्व यांचा समतोल राखला जातो. शरीरामध्ये असणारे सहस्रार चक्र, आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र,स्वाधीस्थान चक्र, मूलाधार चक्र उत्तेजित होऊन अनाहत चक्रावर संगीताचे परिणाम होतात , म्हणजे हृदय चक्रावर संगीताचे परिणाम होतात. असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांनी येथे व्यक्त केले. साने संगीत क्लासेस च्या वतीने विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभाचे आयोजन येथे करण्यात आले होते , याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी मार्गदर्शन केले, ते पुढे म्हणाले की महाभारतात इंद्राच्या आज्ञेनुसार अर्जुन गंधर्व चित्रसेन कडून संगीत कला शिकला. महाभारतात कृष्णाची बासरी एक संगीताचा उत्कृष्ट नमुना आहे. भगवान शंकराचे तांडव नृत्य , हे सर्व संगीत कलेचा अविष्कार आहे, संगीत कला आत्मसात केल्यास भक्ति वाढून, समर्पित भावना निर्माण होऊन चित्ताची एकाग्रता वाढते. याप्रसंगी साने संगीत क्लासच्या वतीने गुणगौरव पारितोषिके प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिवराज साने सर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक लोकमतचे पत्रकार सहदेव खंडागळे होते. या कार्यक्रमाला महा सुपरफास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्ण कांचन, पुणे दख्खन संस्थेचे संस्थापक खलील शेख कवी, दैनिक केसरी चे पत्रकार अमोल भोसले, पत्रकार बापू चौधरी, पत्रकार सुनील तुपे, प्रास्ताविक साने संगीत क्लासचे शिवराज साने यांनी केले, सूत्रसंचालन रोहिदास बिचकुले सर यांनी केले, आभार पत्रकार अमोल भोसले यांनी केले.

