प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे निकष, लाभ जाहीर करा.– जळगांव जूक्टो संघटनेची मागणी.
1 min read

प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे निकष, लाभ जाहीर करा.– जळगांव जूक्टो संघटनेची मागणी.

Loading

प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे निकष, लाभ जाहीर करा.– जळगांव जूक्टो संघटनेची मागणी.

जळगांव:राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या शिक्षक संवर्गासह इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन न देता राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस.)लागू केलेली आहे. मात्र आता ह्या एन.पी.एस. धारकांना केंद्राच्या धर्तीवर दि.२० सप्टेंबर २०२४च्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार राज्याची सुधारित निवृत्त वेतन योजना (RNPS) तसेच केंद्राची एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) लागू करून यापैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्याची मुभा दिलेली आहे. त्यासाठीचा One Time विकल्प ३१ मार्च २०२५अखेर द्यावयाचा होता. राज्याच्या RNPSमध्ये सहभागी झाल्यास अटी,शर्ती, नियम,पात्रता, कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागाला प्राधिकृत करण्यात आलेले आहे. मात्र वित्त विभागाने निर्धारित मुदतीत कोणतीही माहिती न दिल्याने या सहभागी होण्यासाठी दि.२७ मार्च २०२५च्या शासन निर्णयानुसार दि.३१ मार्च २०२६ अखेर १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दिलेली मुदत लवकरच संपत आलेली असताना अद्यापही या योजनेत सहभागी झाल्यास एन.पी.एस. धारकांना सेवानिवृत्तीपश्चात नेमका कसा आणि कितपत आर्थिक लाभ मिळणार आहे या संदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती प्रसारित न झाल्याने निर्धारित मुदतीमध्ये नेमका कोणता विकल्प द्यावा याबाबत कर्मचारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झालेली असल्याने उद्यापासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात कालमर्यादा लक्षात घेता सर्व विभागातील सन्माननीय शिक्षक, पदवीधर आमदार महोदयांनी पाठपुरावा करावा असे साकडे जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा.नंदन वळिंकार प्रा.सुनील सोनार, डॉ.अतुल इंगळे, प्रा.सुनील गरुड,प्रा.सुधाकर ठाकूर,प्रा. राहुल वराडे, प्रा.राजेश कोष्टी, प्रा.किरण पाटील, प्रा.पराग पाटील यांनी घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *