अमळनेरच्या पावन भूमीतून ‘भूमी सुपोषण’चा राष्ट्रव्यापी शंखनाद , भूमीमातेच्या वाढदिवशी हरित क्रांतीची नवी सुरुवात; 19 मार्चला ऐतिहासिक सोहळा,  जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; ‘भूमी सुपोषण’ अभियानासाठी प्रशासन सज्ज
1 min read

अमळनेरच्या पावन भूमीतून ‘भूमी सुपोषण’चा राष्ट्रव्यापी शंखनाद , भूमीमातेच्या वाढदिवशी हरित क्रांतीची नवी सुरुवात; 19 मार्चला ऐतिहासिक सोहळा, जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; ‘भूमी सुपोषण’ अभियानासाठी प्रशासन सज्ज

Loading

अमळनेरच्या पावन भूमीतून ‘भूमी सुपोषण’चा राष्ट्रव्यापी शंखनाद,

भूमीमातेच्या वाढदिवशी हरित क्रांतीची नवी सुरुवात; 19 मार्चला ऐतिहासिक सोहळा,

जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; ‘भूमी सुपोषण’ अभियानासाठी प्रशासन सज्ज

अमळनेर प्रतिनिधी : भूमी सुपोषण या चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मंदिरात भूमिपुत्र श्री मंगळग्रह देवतेची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य शैलीतील विश्वातील एकमेव श्री भूमीमातेची मूर्ती आहे. या चळवळीचा शुभारंभ वर्ष प्रतिपदेला अर्थात गुरुवार, दि. 19 मार्च 2016 रोजी होत आहे. त्याचे कारण म्हणजे या दिवशी श्री भूमीमातेचा वाढदिवस असतो. तसेच हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आहे. केंद्रीय कृषिमंत्री ना. श्री. शिवराजसिंहजी चौहान तसेच देशातील अनेक महनीय व्यक्तींच्या साक्षीने व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. भूमी सुपोषण या चळवळीची एकूणच नितांत आवश्यकता व लोकाभिमुखता लक्षात घेता गुरुवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.
पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योगमंत्री ना. श्री. संजयभाऊ सावकारे, आमदार श्री. अमोलजी जावळे यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनन करणवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अबकारी, कृषी अधिकारी, अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांसह अन्य महत्त्वपूर्ण विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा. श्री. बाळासाहेब चौधरी, भूमी सुपोषण चळवळीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे बैठकीस उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनाही या बैठकीचे रितसर निमंत्रण होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत 19 मार्चच्या कार्यक्रमाचे एकूणच आयोजन- नियोजन यशस्विता याबाबत सखोल चर्चा झाली. डॉ. महाले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या तयारी व अवाक्याबाबत माहिती दिली. आशिष चौधरी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी सहकार्य केले. मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीतच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीच्या स्पष्ट सूचना दिल्या. नजीकच्या काळात जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत आणखी काही बैठका होतील. तिन्ही मंत्री महोदय यात जातीने लक्ष घालून वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत.

भूमी सुपोषण चळवळ शुभारंभ कार्यक्रमासंदर्भात जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुुरुवारी झालेल्या विशेष बैठकीस उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा. श्री. बाळासाहेब चौधरी, भूमी सुपोषण चळवळीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील, जलसंपदामंत्री ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योगमंत्री ना. श्री. संजयभाऊ सावकारे, आमदार श्री. अमोलजी जावळे, जिल्हाधिकारी मा. श्री. रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करनवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, मंगळग्रस सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी आदी विभागांचे प्रमुख अधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *