जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय , जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी , जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार
![]()
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय
जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी
जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
“जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर यश नक्कीच आपल्या पायाशी येते,” याचे जिवंत उदाहरण ठरली आहे अमळनेरची विद्यार्थिनी समृद्धी योगेश सुहागीर. तिने JEE Mains – जानेवारी 2026 परीक्षेत 98.93 पर्सेंटाईल मिळवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
विषयानुसार उज्ज्वल कामगिरी
भौतिकशास्त्र (Physics): 95.48 पर्सेंटाईल
रसायनशास्त्र (Chemistry): 96.60 पर्सेंटाईल
गणित (Mathematics): 99.68 पर्सेंटाईल
विशेष म्हणजे मँथ विषयात तिने 99.68 पर्सेंटाईल मिळवत आपली भक्कम पकड सिद्ध केली आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध वेळापत्रक आणि स्वअनुशासन यामुळे हे यश शक्य झाले, असे समृद्धीने नमूद केले.
शैक्षणिक प्रवास
समृद्धीने दहावीच्या परीक्षेत पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलमधून 93 टक्के गुण मिळवले होते. सध्या ती मुंदडा उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करत तिने आपला ध्यास जपला.
पुढचे लक्ष्य – JEE Advanced
समृद्धीचे पुढील उद्दिष्ट JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण करून देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश मिळवणे आहे. भविष्यात ती इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार बाळगून आहे.


मार्गदर्शकांचे योगदान
या यशामागे मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.
विनोद यादव, रोषण कुमार, मुनिस तुल, इस्लाम मट्टू, अनुज पाल यांच्या मार्गदर्शनामुळे समृद्धीला योग्य दिशा मिळाली.
कष्टाळू पालकांची प्रेरणा
समृद्धीचे वडील योगेश आनंदराव सुहागीर यांचा परीवार(रोहित तबला सेंटर, पैलाड, अमळनेर) हे गेल्या तीन-चार पिढ्यांपासून पारंपरिक व्यवसायात कार्यरत आहेत. आई सौ. ज्योती योगेश सुहागीर यांनीही मुलांना शिक्षणासोबत उत्तम संस्कार दिले. पालकांच्या कष्टमय जीवनातून प्रेरणा घेत समृद्धीने अभ्यासात प्रामाणिकपणा जपला. “आई-वडिलांचे श्रम आणि त्यांचा विश्वास हेच माझे खरे बळ आहे,” असे ती नम्रपणे सांगते.
अभिनंदनाचा वर्षाव
समृद्धीच्या या यशाबद्दल वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नानासाहेब चंद्रकांत भदाणे,
धनराज पाटील भास्कर पाटील दीपक पाटील,
पत्रकार ईश्वर महाजन, तसेच अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समृद्धी सुहागीरची ही कामगिरी अमळनेरच्या शैक्षणिक इतिहासात प्रेरणादायी ठरली आहे. तिच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
“स्वप्न मोठं असलं की, मेहनतही तितकीच मोठी असावी लागते,” हा संदेश समृद्धीच्या यशातून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतो.

