व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी….
1 min read

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी….

Loading

व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी….

अमळनेर प्रतिनिधी

*”आले किती,गेले किती*
*उडून गेले भरारा*
*संपला नाही आणि संपणारही*
*नाही माझ्या शिवबाचा दरारा”*
अशा अनेक शिवगर्जना करत संपूर्ण शिवमय वातावरणात व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये सर्व शिक्षक,विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग दर्शविला. शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची सुंदर व्यक्तिरेखा साकारली होती.शिवजयंती निमित्त शाळेत भाषण, रांगोळी तसेच छान छान असे नृत्य व पोवाडे विद्यार्थ्यांनी सादर केले.तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
“झुलवा पाळणा पाळणा , बाळ शिवाजीचा”या सुंदर गाण्याने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि भगवे ध्वज हातात घेऊन महाराजांबद्दलचा आदर प्रेम व अभिमान व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिवाजी महाराजांचा संघर्ष व त्यांचा इतिहास सांगितला तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. शाळेच्या सचिव सौ.अलका पवार व मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद योगिता फाळके, मनीषा सोनार, प्रतीक्षा पाटील, नीतू शेलकर संगीता पाटील,कविता पाटील, मनीषा ठाकूर, रोशनी महाजन, जयश्री परदेशी, चारूलता तायडे,प्रियंका महाले तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *