म.वा.मंडळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*
![]()
*म.वा.मंडळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर- स्वराज्याचे संस्थापक, शाश्वत विकासाची हमी देणारे तत्वज्ञान सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य आत्मसात करणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन येथिल मराठी वांड्•मय मंडळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त म.वा.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.रविंद्र कुलकर्णी, जेष्ठ मार्गदर्शक अजयभाऊ केले,डॉ.महेश पाटील,डॉ.विजय तुंटे यांनी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.
याप्रसंगी आर डी पाटील,चंद्रकांत शिंदे,गोविंद पाटील,हनुमंत पाटील,शांताराम पाटील,हेमंत बाळापुरे,जगदिश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

