जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील  समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान
1 min read

जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान

Loading

जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज- पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील

समता युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची जागृती; गुणवंतांचा सन्मान

अमळनेर प्रतिनिधी

समता युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध शाळांमध्ये महत्वपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, चारित्र्यसंस्कार आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. गौतम मोरे, रामेश्वर भदाणे आणि अशोक बिहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे अनेक वक्त्यांना तयार करून त्यांच्यामार्फत विविध शाळांमध्ये जाऊन थोर पुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
शिवजयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथे
देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे
पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील यांना अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी व्याख्यानासाठी नियुक्त केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण व्याख्याते राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या प्रभावी व ओजस्वी भाषणातून राजेंद्र पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, स्वराज्य स्थापनेच्या अद्वितीय कार्याचा आणि अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून सर्व घटकांना सोबत घेऊन उभारलेल्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख केला. “जिजाऊंनी घडवलेले संस्कार आणि शिवरायांचे आदर्श आजच्या पिढीसमोर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याची तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी संस्कारमूल्यांचे शिक्षण आवश्यक आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा उजाळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
याच प्रसंगी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा, पुणे मार्फत हिंदी शिक्षक आय. आर. महाजन यांनी घेतलेल्या परीक्षेतील इयत्ता आठवी व नववीच्या एकूण २२ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक एच. ओ. माळी, एस. के. महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील व गुरुदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय. आर. महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. के. महाजन यांनी मानले.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यसंस्कार आणि आदर्श जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *