ग.स.सोसायटीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*
![]()
*ग.स.सोसायटीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*
जळगाव -येथील जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव ग स सोसायटी या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सोसायटीच्या मुख्य कार्यालयात दिनांक 19/02/2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
सदर प्रसंगी संस्थेचे संचालक तथा पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री विजय शांतीलाल पवार, व्यवस्थापक श्री वाल्मीक पाटील यांनी महाराजांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.यावेळी मुख्य कार्यालयातील अधिकारी व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

