झाडी गावात IDBI बँकेच्या मिनी शाखेचे जल्लोषात उद्घाटन; ग्रामीण बँकिंग सुविधांना नवे बळ
![]()
झाडी गावात IDBI बँकेच्या मिनी शाखेचे जल्लोषात उद्घाटन; ग्रामीण बँकिंग सुविधांना नवे बळ
अमळनेर प्रतिनिधी :
दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी झाडी गावात IDBI Bank च्या मिनी शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या नव्या मिनी शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक बँकिंग सुविधा आता त्यांच्या गावातच उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्घाटन प्रसंगी Atyati Technologies Pvt. Ltd. तसेच IDBI बँकेचे विविध मान्यवर अधिकारी उपस्थित होते. सर्फराज शेख (क्षेत्रीय प्रबंधक, IDBI Bank), निजामुद्दीन पिरजादे (राज्य प्रमुख, Atyati Technologies Pvt. Ltd.), निलेश काथड (वित्तीय समावेशन विभाग, IDBI Bank), धर्मा सर (PND, IDBI Bank), सुधाकर परिहार (प्रबंधक, IDBI Bank अमळनेर), सागर जी (उपप्रबंधक, IDBI Bank अमळनेर) आणि नवनीत देसले (क्षेत्रीय समन्वयक, Atyati Technologies Pvt. Ltd.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने मिनी शाखांचे महत्त्व अधोरेखित केले. बचत खाते उघडणे, रोख रक्कम जमा व पैसे काढणे, शासकीय योजनांचे थेट लाभ, तसेच विविध बँकिंग सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सुविधेमुळे झाडी व परिसरातील नागरिकांना आता बँकिंग व्यवहारासाठी दूरवर जावे लागणार नाही, वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
कार्यक्रमास लोक न्यूजचे संपादक संभाजी देवरे, संभाजी पाटील, भाऊसाहेब जगदाने, संदीप निकम, गायत्री पाटील, विशाल पाटील, बापू जगदाने, सुषमा पाटील, मनीषा पाटील, निता पाटील यांच्यासह गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप प्रसंगी ग्रामस्थांनी IDBI बँक व Atyati Technologies यांचे मनापासून आभार मानत झाडी गावाच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीकडे टाकलेले हे एक ठोस पाऊल असल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त झाली.

