तीन वर्षांच्या अंधाराला अखेर पूर्णविराम! डीडी नगर ते भारत गॅस मुख्य रस्ता प्रकाशमय; नागरिकांत समाधानाची लाट
1 min read

तीन वर्षांच्या अंधाराला अखेर पूर्णविराम! डीडी नगर ते भारत गॅस मुख्य रस्ता प्रकाशमय; नागरिकांत समाधानाची लाट

Loading

तीन वर्षांच्या अंधाराला अखेर पूर्णविराम!
डीडी नगर ते भारत गॅस मुख्य रस्ता प्रकाशमय; नागरिकांत समाधानाची लाट

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ मधील डीडी (DD) नगर ते भारत गॅस, धुळे रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या तब्बल तीन वर्षांपासून अंधारात होता. सायंकाळ होताच या मार्गावर भीतीचे सावट निर्माण होत असे. वाहनचालक, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अंधाराला अखेर पूर्णविराम मिळाला असून संपूर्ण रस्ता नव्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.
या कामासाठी मा. आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सकारात्मक निर्णय घेण्यात आला. स्थानिक नगरसेवक रवि पाटील आणि महेश देशमुख यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ मुख्याधिकारी गणेश शिंदे, दिवाबत्ती अभियंता कृणाल महाले व रवि उदयवाल यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही केली.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नवीन विद्युत दिवे बसविण्यात आले आणि अवघ्या काही दिवसांत मुख्य रस्ता प्रकाशमय झाला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कामाच्या ठिकाणी नगरसेवक रवि पाटील, महेश देशमुख, दीपक पाटील, धनंजय देसले, रामकृष्ण पाटील, युवराज पाटील, विजय माळी, जिजाबराव पाटील तसेच नगरपरिषद कर्मचारी आबिद शेख, मनोज सोनार, दीपक मद्रासी आदी उपस्थित होते.
तीन वर्षे अंधारात असलेला हा रस्ता आता प्रकाशाने उजळल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षितता आणि सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला असून भविष्यातही अशाच मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *