कल्याण येथे बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्टापट्ट्या असलेल्या सापाची सुटका,*
![]()
*कल्याण येथे बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्टापट्ट्या असलेल्या सापाची सुटका,*
कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्याबट्या सापाची सुटका करून सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिले जीवदान.
*
ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी )- रस्त्यावर फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या काळ्या चट्याबट्याच्या सापाला सर्पमित्रानं शिताफीनं बाटलीतून सुटका करत त्या सापाला जीवदान दिलं आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील वाडेघर परिसरातील रोनक सिटी मधील शंकर मंदिरासमोर घडली आहे. या सापाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जीवनदान दिलं.
विषारी बिन विषारी साप भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना सातत्याने घडतच आहेत. आजही मानवी वस्तीत साप शिरल्याची घटना घडली आहे. हवामानात बदल झाल्यानं पहाटेच्या हुडहुडी भरवणाऱ्या थंडीतून ऊब मिळावी म्हणून साप मोकळ्या जागेत येत असतात. कल्याण पश्चिम भागातील वाडेघर परिसरातील रोनक सिटी रोड वरील शंकर मंदिरासमोर काळ्या रंगाचा चट्याबट्याचा साप रिकाम्या बाटलीत अडकून पडल्याचं या परिसरातील नागरिक अभिजित कारभारी यांना दिसले.
अभिजित कारभारी यांनी तातडीनं सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून या सापाची माहिती दिली. माहिती मिळताच काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ज्या बाटलीत हा साप अडकून पडला होता. त्या बाटलीचं निरक्षण करुन त्या बाटलीत तंगुसचा बारीक धागा टाकून त्या सापाला शिताफीनं कुठही इजा न होता बाहेर काढलं.
बाटलीतून सापाला बाहेर काढल्यानंतर एका पिशवीत बंद केल्यानं बघणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप दिवड जातीचा असून बिनविषारी आहे. तर त्याचे आवडते खाद्य पाण्यातील मासे आणि लहान बेडूक असतात. इतर सापांच्या तुलनेत हा साप चपळ असतो, अशी माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. या दिवड जातीच्या सापाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनं निसर्गाच्या सानिध्यात आज सोडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

