रणाईचे माध्यमिक विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी :
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण शाळा परिसरात आदर, श्रद्धा आणि प्रेरणेचे वातावरण अनुभवायला मिळाले.कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी संस्थेचे समन्वयक श्री. पियुष दादा शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. इन्शुलकर सर, शिक्षक श्री. पी. डी. पाटील सर, श्री. बी. डी. ठाकरे सर, श्री. व्ही. एस. कापडणीस सर, श्रीमती एस. आर. पाटील मॅडम, श्रीमती रीना पाटील मॅडम, श्री. डी. व्ही. देसले सर, शाळेचे लिपिक श्री. एल. व्ही. पाटील, शिपाई श्री. जी. टी. पाटील तसेच विद्यार्थी-पालक प्रतिनिधी श्री. जयसिंग बंजारा व श्री. लक्ष्मण बंजारा उपस्थित होते. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या समाजप्रबोधन, समता आणि नैतिक मूल्यांच्या विचारांची प्रभावी मांडणी केली. काही विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे सादर केली, तर काहींनी संतांच्या विचारांवर आधारित कविता आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. डी. डी. इन्शुलकर यांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जबाबदार व सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले. समाजात बंधुभाव, प्रामाणिकपणा आणि सेवा वृत्ती जोपासण्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन शिक्षकवर्ग व विद्यार्थी प्रतिनिधींनी केले. शेवटी सर्वांनी संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जयंती उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, सामाजिक जाणीव आणि संस्कारांची बीजे रोवली गेली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


